गणेशोत्सव 2025

Amit Shah & Devendra Fadnavis: अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, फडणवीस ही उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज लालबागच्या राजाच्या चरमी नतमस्तक होणार आहेत.

Published by : Team Lokshahi

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ठिकठिकाणी साजरा केला जात आहे. कालच दीड दिवसाच्या बाप्पांच विसर्जन झालं अनेक भक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला आनंदाने आणि भावूक होऊन निरोप दिला. गणेश चतुर्थीचा आजचा तिसरा दिवस आहे या दिवशीही लालबाग परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सध्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर गणेशोत्सवा निमित्त लालबागच्या राज्याच्या दर्शनाला पहिल्या दिवसापासून भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. तर भाविकांसाबतच अनेक मराठी तसेच हिंदी सेलिब्रिटींनी ही लालबागच्या राज्याचे दर्शन घेतले त्यांचसोबत अनेक राजकीय लोकांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले.

त्याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज लालबागच्या राजाच्या चरमी नतमस्तक होणार आहेत. अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असताना आज दुपारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते दाखल होणार आहेत. तसेच लालबागच्या राज्याचे दर्शन घेऊन झाल्यावर अमित शाहा आणि एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचंही दर्शन घेणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा